
हरिहरेश्वर येथे राहण्यासाठी रूम न देण्याच्या कारणावरुन पुण्याच्या पर्यटकांनी महिला चिरडल्याची धक्कादायक घटना
. रायगड हरिहरेश्वर येथे राहण्यासाठी रूम न देण्याच्या कारणावरुन पुण्याच्या पर्यटकांनी महिला चिरडल्याची धक्कादायक घटना शनिवारी (ता. 19) रात्री दीड च्या सुमारास घडली. या प्रकरणातील महिलेचा जागीच अंत झाला आहे. एकाळा स्थानिकांनी पकडले तर उतर पर्यटकांचा पोलीस शोध घेत आहेत. याबाबतीत सविस्तर माहिती अशी कि, पुणे येथील अकरा पर्यटक एक स्कार्पिओ भरून यावेळी हरिहरेश्वर येथील अभि धामणस्कर यांच्या ममता होम स्टे येथे राहण्याच्या चौकशीसाठी आले होते. हे सर्व पर्यटक अत्यंत मद्यधुंद अवस्थेत होते. धामणस्कर यांनी रूम दाखवल्यानंतर रुमभाडे बाबत ठरवताना मालकाच्या लक्षात आले कि हे सर्व अत्यंत दारू प्यायलेले असून तुम्ही दुसऱ्या ठिकाणी रूम बघा अशी विनंती केली.तेव्हा गाडीतील एकाने धामणस्कर यांना कानाखाली लगावली व पळून गेले. मात्र त्यातील एकजण बाहेर उतरला असल्याने त्यांना स्थानिकांनी कॉल करून बोलावून घेतले. परंतु इतरजण कुणी स्कॉर्पिओ कार मधून बाहेर न येत थेट रिव्हर्स घेण्याच्या बहाण्याने अभि यांची बहीण ज्योती धामणस्कर यांना जोरदार धडक दिली. हि धडक इतकी जोरदार होती कि त्यांचा जागीच मृत्यू झाला व बाकीचे पळून गेले.