
एसटी संपाच्या दुसर्या दिवशीही एसटी वाहतूक ठप्प,प्रवाशांचे हाल
एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण व्हावे या मागणीसाठी राज्यात ठिकठिकाणी एसटी कर्मचारी संघटनांनी संप पुकारला आहे
आज एसटीच्या संपाचा दुसरा दिवस होता आज सकाळपासून रत्नागिरी जिह्यात तसेच शहरात सर्व एसटीच्या गाड्या आहेत रत्नागिरी शहरातील मध्यवर्ती स्थानक असलेले रहाटाघर हे पूर्णपणे बंद आहे या स्थानकावरून सकाळच्या वेळेस कुठलीही एसटी सुटलेली दिसली नाही फक्त देवरुख देवरुख एसटी रत्नागिरी स्थानावरून सुटलीएसटी वाहतूक ठप्प झाल्याने विशेषत ग्रामीण भागातून येणाऱ्या लोकांचे मोठे हाल झाले आहेत सध्या शाळा कॉलेजना सुट्टी असल्याने त्यांच्यावर परिणाम झाला असला तरी अनेक जण सुट्टीसाठी गावाला गेलेले असल्याने ते परत येण्यासाठी त्यांना एसटी मिळत नसल्याने ते अडचणीत आले आहेत एसटी वाहतूक बंद असल्याने खासगी व वडाप वाहतुकही गाड्यांची मात्र चलती आहे बसस्थानकात शुकशुकाट असून अनेक एसटी बस आगारात उभ्या आहेत एसटीची वाहतूक बंद असल्याने अनेक प्रवासी आता खाजगी व रिक्षा वाहतुकी वर अवलंबून आहेत
www.konkantoday.com