
रत्नागिरीत मराठी रंगभूमीदिन साजरा
अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा रत्नागिरीच्यावतीने रंगभूमीदिन नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री ना. उदय सामंत यांच्या हस्ते नटराजाचे पूजन करण्यात आले. कोकण मराठी साहित्य परिषदेचे नूतन जिल्हाध्यक्ष डॉ. शशांक पाटील यांचा नाट्य परिषदेच्यावतीने ना. उदय सामंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
नाट्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेचे कार्याध्यक्ष समीर इंदुलकर, अनिल दांडेकर, प्रफुल्ल घाग, विजय पोकळे, राजकीरण दळी, आसावरी शेट्ये आदी रंगकर्मी या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सायंकाळच्या सुमारास स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहाच्या प्रांगणात स्थानिक रंगकर्मींचे विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमाला रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
www.konkantoday.com