
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचा भूमिपूजन सोहळा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचा भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे. हा पालखी मार्ग वारकरी संप्रदायासाठी उभारण्यात येत आहे.आज ऑनलाईन माध्यमातून हा भूमिपूजन सोहळा पार पडेल. आज दुपारी साडे तीन वाजता हा भूमिपूजन सोहळा पार पडेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या सोहळ्याला उपस्थित राहतील. जवळपास 10 कोटींचा हा पालखी मार्ग आहे.
या सोहळ्याला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही उपस्थित राहणार आहेत. या दोन्ही मार्गाच्या चौपदरीकरणाची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज होणार आहे.
www.konkantoday.com