
चार दिवसांत बचत गटांनी केली पंधरा लाखांची उलाढाल
महिला बचत गटांनी दिवाळीसाठी तयार केलेल्या विविध उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी रत्नागिरीत आयोजित सरस दिवाळी महोत्सवाच्या चार दिवसात सुमारे १५ लाख रुपयांची उलाढाल झाली. ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून पुढील महिन्यात गणपतीपुळेत होणार्या सरस प्रदर्शनात वेगळी संकल्पना राबविली जाईल, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी केले.
www.konkantoday.com