राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी आता राज्य सरकार विशेष समिती नेमणार
विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी आता राज्य सरकार विशेष समिती नेमणार आहे. या समितीची रूपरेषा सोमवारी (ता.८) सादर करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले. कर्मचारी संघटनांनी तूर्तास संप मागे न घेण्याची भूमिका कायम ठेवली.
कर्मचाऱ्यांच्या संपामुळे आज राज्यातील ७२ आगार बंद होते. त्यामुळे आता न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही संप सुरूच राहणार आहे. कर्मचारी आणि महामंडळ यांच्यात चर्चा करण्यासाठी आणि संपावर तोडगा काढण्यासाठी वरिष्ठ स्तरावरील सचिवांची समिती नियुक्त करण्याची तयारी राज्य सरकारकडून दर्शविण्यात आली.
www.konkantoday.com