
तुमचे सामान विमानतळापासून घरापर्यंत पोहोचवले जाणार-इंडिगोची खास सेवा
कुठल्यातरी महत्त्वाच्या कामासाठी किंवा फिरायला जायचं असेल तर प्रवास आलाच. मग, प्रवासादरम्यान सामान किती घेऊन जायचे?, पोर्टरचा वेगळा खर्च, घरातून विमानतळावर सामान आणून मग बोर्डिंग करून कन्व्हेयर बेल्टवर थांबणं.या सगळ्या तणावातून बाहेर पडण्यासाठी इंडिगोने (Indigo)खास सेवा सुरू केली आहे.
या सेवेअंतर्गत तुमचे सामान विमानतळापासून घरापर्यंत पोहोचवले जाणार आहे. इंडिगोने म्हटले आहे की, डोअर-टू-डोअर बॅगेज ट्रान्सफर सर्व्हिस सुरू करण्यात आली आहे. जिथून प्रवास सुरू होत आहे, तिथून सामान सुरक्षितपणे उचलले जाईल आणि तुमच्या गंतव्य स्थानापर्यंत पोहोचवले जाईल.
इंडिगोची ही विशेष सेवा सध्या बंगळुरू, दिल्ली, हैदराबाद आणि मुंबईसाठी सुरू करण्यात आली आहे.
www.konkantoday.com