
खेड तालुक्यात आवाशीत मगरीचा वावर वाढला, रहिवासी भयभीत
रात्रीच्या वेळी घराच्या अंगणात किंवा पारसबागेत येवून बसणार्या मगरींमुळे खेड तालुक्यातील आवाशी गणेशनगर येथील रहिवाशांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.
आवाशी गावाच्या गणपती विसर्जन तलावाभोवती गणेशनगर ही वस्ती गेली अनेक वर्षापासून वसली आहे. या तलावात मगरींचा वावर आहे. काहींना तिचे अनेकदा दर्शनही झालेले आहे. मात्र गणपती उत्सवाआधीपासून तिचे सातत्याने दर्शन होत आहे. याची माहिती तेथील रहिवाशांनी आवाशी ग्रामपंचायतीला दिली आहे. ग्रामपंचायतीनेही तात्काळ ही माहिती वनविभागाला कळविली. मात्र वनविभागाकडून अपेक्षित अशी दखल घेतली गेलेली नाही. www.konkantoday.com