सह्याद्रीच्या ऑनलाईन चित्र, शिल्प स्पर्धेत ३७ कलाकृती सरस
चित्रकार, शिल्पकार सदानंद बाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून सावर्डे येथील सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट कला महाविद्यालयात ऑनलाईन चित्र, शिल्प स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील विविध ठिकाणच्या स्पर्धकांनी सहभाग घेतला. त्यापैकी ३७ कलाकृती सरस ठरल्या असून पारितोषिकाच्या मानकरी ठरल्या आहेत. दि. १० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वा. पारितोषिक वितरण समारंभ व कला प्रदर्शनाचा उदघाटन सोहळा कला महाविद्यालयाच्या कला दालनात आयोजित करण्यात आला आहे.
www.konkantoday.com