राणेंचे पाच जन्म गेले तरी नाणारमध्ये रिफायनरी नाही -खासदार विनायक राऊत
सिंधुदुर्गातील सी-वर्ल्डला आम्ही विरोध केला नाही. मात्र सी-वर्ल्डच्या नावाखाली जी एक हजार एकर जमीन नीलम हॉटेल प्रायव्हेट लिमिटेडसह अन्य कंपन्या कवडीमोल दराने घेण्याचे काम करत होते. त्याला स्थानिकांनी विरोध केला. तोंडवळीच्या नावावर वायंगणीतील सुपीक जमीन तुम्ही घेत आहात त्याऐवजी परप्रांतीयांनी जी जमीन घेतली होती. तोंडवळी व वायंगणीच्या सीमेवर तिथे सी-वर्ल्ड करा यासाठी समर्थनार्थ आहोत. ४०० एकरमध्ये सी-वर्ल्ड करतो असे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही स्पष्ट केले होते.
राणेंचे पाच जन्म गेले तरी नाणारमध्ये रिफायनरी नाही, असेही राऊत ठाम पणे सांगुन राऊत यानी पुन्हा एकदा रिफायनरीला विरोध केला आहे
www.konkantoday.com