रत्नागिरी व रायगड मध्ये ११ घरफोड्या करणारा आरोपी कॉलेजमध्ये लॅब टेक्निशियन , आरोपीला रायगड पोलिसांकडून अटक
रत्नागिरी व रायगड जिल्ह्यात घरफोड्या करत लाखोंचा ऐवज लुटणाऱ्या एका चोराला पोलिसांनी जेरबंद केलं आहे. हा चोर एका कॉलेजमध्ये लॅब टेक्निशियन असल्याची माहिती मिळत आहे.
संकेत अंजर्लेकर असं या आरोपीचं नाव असून त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. महाड, माणगाव आणि दापोली परिसरात घरफोड्या करत त्यानं लाखो रुपयांचा ऐवज लुटला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. संकेत अंजर्लेकर याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून १५ लाख रुपये किंमतीचे दागिने त्याच्याकडून जप्त केले आहेत.
संकेत कॉलेजमध्ये लॅब टेक्निशियन म्हणून कार्यरत आहे. रायगड आणि रत्नागिरी परिसरात सुमारे ११ घरफोड्या केल्याची कबुली संकेतनं दिली आहे.
www.konkantoday.com