राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरीत ,रत्नागिरी पालिकेच्या नवीन प्रशासकीयइमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन
राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे आज मंगळवारी रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते वैशिष्ट्यपूर्ण योजनेतूनघेण्यात आलेल्या रत्नागिरीपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजनहोणारआहे.पालकमंत्रीअॅड. अनिल परब, उच्च व तंत्रशिक्षमंत्री उदय सामंत, खासदारविनायक राऊत उपस्थित राहणार आहेरत्नागिरी पालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचा विषय अनेकवर्षे रखडला होता. मात्र मंत्री उदय सामंत यांच्या पाठपुराव्यामुळे सुमारे १४ कोटीची तीन मजलीप्रशासकीय इमारत होणार आहे. येथील निर्माण ग्रुपला याचाठेका मिळाला असून वर्षामध्ये इमारत उभी करण्याचे उद्दिष्ट या ठेकेदार कंपनीपुढे आहे. नवीन इमारतीच्या कामाचे भुमिपूजननगरविकास राज्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.ते सकाळी हेलिकॉप्टरने १०.३० वाजताठाण्यातूनरत्नागिरीविमानतळावर येणार आहे. ११ वाजता त्याच्या हस्ते पालिकेच्यानूतन प्रशासकीय इमारतीच्या कामाचे भूमिपूजन होणार आहे.त्यानंतर जिल्ह्यातील पालिका, नगरपंचायतीच्या प्रशासकीय व
विविध विकास कामांचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयातघेण्यात येणार आहे. नंतर ते ठाण्याला रवाना होणार आहेत.कार्यक्रमाला पालकमंत्री अनिल परब,मंत्रीउदयसामंत,खासदार विनायक राऊत, विधानपरिषद सदस्य अनिकेततटकरे, जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, नगराध्यक्ष प्रदीपसाळवी,मुख्याधिकारीतुषारबांबर,व अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
www.konkantoday.com