दादरा-नगर हवेली लोकसभा पोटनिवडणूक: शिवसेनेच्या कलाबेन डेलकर यांची निर्णायक आघाडी
*सिल्वासा: दादरा-नगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार आणि माजी अपक्ष खासदार मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांनी आघाडी घेतली आहे. खासदार मोहन डेलकर यांनी आत्महत्या केली होती. त्यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक घेण्यात आली. दादरा-नगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू असून कलाबेन डेलकर यांनी एकतर्फी आघाडी घेतली आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेच्या कलाबेन डेलकर यांना 1 लाख दोन हजार मते मिळाली असून भाजपचे उमेदवार महेश गावित यांना 56 हजार 636 मते मिळाली आहेत. मतमोजणी अजूनही सुरू आहे.
कलाबेन डेलकर यांचा विजय झाल्यास त्या शिवसेनेच्या महाराष्ट्राबाहेरील पहिल्या खासदार असणार आहेत.
www.konkantoday.com