
मुंबई गोवा महामार्गावर जिह्याचे प्रवेशद्वार असलेल्या कशेडी पोलिस मदत केंद्रात अनेक पदे रिक्त ,१२ कर्मचारी कार्यरत
रत्नागिरी जिह्याचे प्रवेशद्वार असलेल्या व मुंबई गोवा महामार्गावरील महत्त्वाचे ठिकाण असलेल्या कशेडी घाटात असलेल्या पोलिस मदत केंद्रात अपुरे कर्मचारी असल्याचे दिसत आहे या मदतकेंद्रासाठी ४२पदे मंजूर आहेत परंतु अनेक कारणांमुळे ही पदे रिक्त आहेत केवळ १२कर्मचारी या ठिकाणी कार्यरत आहेत मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुकीत मोठय़ा प्रमाणावर वाढ झाली आहे अपघाताचे प्रमाणही काही प्रमाणात वाढले आहे अपघात झाल्यानंतर पोलिस मदत केंद्रातील कर्मचाऱ्यांना तेथे धाव घ्यावी लागते सध्या या ठिकाणी एक अधिकारी सात सहायक पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक ,तीन पोलिस नाईक व शिपाई व एक चालक एवढेच कर्मचारी आहेत यामुळे या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे
www.konkantoday.com