नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आरोप
राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देताना जोरदार हल्ला चढवला.तसेच नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा गंभीर आरोप केला. लवकरच याबाबतचे पुरावे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पाठवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. “नवाब मलिक यांनी सुरुवात केली आहे. त्यामुळे त्यांना आता हे शेवटापर्यंत न्यावे लागेल,” असा सूचक इशारा फडणवीस यांनी मलिकांना दिला. यावर नवाब मलिक यांनी ट्वीट करत केवळ ३ शब्दात प्रत्युत्तर दिलंय.
नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांना ट्विटरवर टॅग करत म्हटलं, “है तैयार हम”
www.konkantoday.com