आमची वाशिष्ठी आमची जबाबदारी’ या मोहीमेंतर्गत हा प्रश्न सुटेपर्यंत आपला लढा सुरुच -सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पवार
वाशिष्ठी नदीतील पाण्याच्या पूर नियंत्रणासाठी चिपळूण, खेर्डी, सती या भागातील २०-३० फुट साचलेला संपुर्ण गाळ व नदीपात्रालगत ठेवण्यात आलेले डोंगरुरपी मकींग काढण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पवार यांनी जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांच्याकडे केली तसेच ‘आमची वाशिष्ठी आमची जबाबदारी’ या मोहीमेंतर्गत हा प्रश्न सुटेपर्यंत आपला लढा सुरुच राहील, असे प्रकाश पवार यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले आहे.वाशिष्ठी नदीपात्रात कोळकेवाडी पहीला, दुसरा तसेच चौथ्या टप्याचे खोदकाम व बांधकाम चालू असताना सर्व प्रकारचे मकींग व मोठया प्रमाणात दगड, धोंडयासह गाळ नदीपात्रात टाकण्यात आलेला आहे. तसेच अनेक वर्षानुवर्षे डोंगर व दऱ्यातील वाहुन येणारा सर्व प्रकारचा झाडे-झुडुपांसह, पालापाचोळा वगैरेचा माळ तसेच नदीपात्रात अनेक नद्या व नाल्यांचे पाण्यातून येणारा सर्व प्रकारचा गाळ व पाणी इत्यादीमुळे वाशिष्ठी नदीपात्र सर्व प्रकारच्या गाळाने मोठ्याप्रमाणात होरलेले व भरलेले आहे ही वस्तुस्थिती आहे.
www.konkantoday.com