मुंबई – कोकण मार्गावरील खासगी बसप्रवासही २० टक्क्यांनी महागला

एकीकडे एसटीने दरवाढ केली असताना मुंबई – कोकण मार्गावरील खासगी बसप्रवासही २० टक्क्यांनी महागला आहे. इंधन दर आणि खड्ड्यांमुळे वाढलेला दुरुस्ती खर्च भाडेवाढीस कारणीभूत असल्याचे ट्रॅव्हल्स व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
सलग सुट्ट्या आणि सणासुदीचा काळवगळता हे दर कायमस्वरूपी लागू राहतील.
मुंबई – कोकण मार्गावर ये-जा करणाऱ्या ट्रॅव्हल्सचालक – मालकांची बैठक नुकतीच पार पडली. यात भाडेवाढीचा प्रस्ताव मांडण्यात आला. दिवसेंदिवस वाढत जाणारे डिझेलचे दर, खड्डेमय रस्त्यांमुळे सतत वाढणारा दुरुस्ती खर्च आणि वारंवार बदलत राहणारे वाहतुकीचे नियम पाहता व्यवसाय करणे कठीण झाले आहे. यावर तोडगा काढण्यासाठी दरवाढ हा एकमेव उपाय असल्याचे मत बहुतांश सदस्यांनी मांडले. चर्चेअंती किमान भाडेदरात २० टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button