चोरीच्या उद्देशाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीत दोन वृद्ध महिलांचा खून,हत्याकांडाने सावंतवाडी हादरली
एकमेकांच्या आधाराने राहत असलेल्या सावंतवाडी शहरातील उभाबाजार येथील दोन वृद्ध महिलांचा निर्घृण खून झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आल्याने सावंतवाडीत खळबळ उडाली आहे.हा खून चोरीच्या उद्देशाने झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे यामुळे एकाकी राहणाऱ्या वृद्धांचा सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे
खून झालेल्या महिलांची नावे नीलिमा नारायण खानविलकर(८०) व शालिनी शांताराम सावंत(७५) असे या खून झालेल्या महिलांची नावे आहेत.
उभाबाजार याठिकाणी राहत असलेल्या नीलिमा खानविलकर यांच्यासह त्यांच्या केअर टेकर शालिनी सावंत राहत होत्या.सावंतवाडी येथील प्रसिद्ध सुवर्णकार तथा सामाजिक कार्यकर्ते राजू मसुरकर यांच्या श्रीमती खानविलकर या नातेवाईक असल्याने श्री.मसुरकर हे रोज सकाळी त्यांच्या घरी त्यांना टीव्ही लावून देण्यासाठी व त्यांच्या चौकशीसाठी येत असत.नेहमीप्रमाणे आज सकाळी राजू मसुरकर या याठिकाणी आले असता त्यांना घरात दोघींचीही उपस्थिती दिसून आली नाही.त्यांनी हाका मारल्या पण प्रतिसाद मिळाला नाही.म्हणून त्यांनी आतील खोलीत जाऊन पाहिले असता त्या दोघी रक्तबंबाळ अवस्थेत पडल्या होत्या.
गळ्यावर वार करून हत्या करण्यात आली असून याबाबत पोलिसांना मसुरकर यांनी घटनेची माहिती देताच पोलीस निरीक्षक तौसिफ सय्यद हे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले आहेत.खुन नेमका कशासाठी झाला याचा तपास पोलीस करत असून या दुहेरी खुनाने सावंतवाडी शहर हादरले आहे.
www.konkantoday.com