कोकण रेल्वेच्या लोकल गाड्या व करंट तिकिट सुरु करा- राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांच्या नेतृत्वाखाली कोकण रेल्वेला निवेदन
खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मा.रेल्वे स्थानक प्रमुख यांना खेड कोकण रेल्वे स्थानक येथे दापोली विधानसभा मतदार संघाचे माजीआमदा.संजयराव कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत कोकण रेल्वेच्या लोकल गाड्या व करंट तिकिट सुरु करण्यात याव्या यासाठी निवेदन देण्यात आले.
*कोरोना काळात प्रादुर्भाव वाढु नये या कारणास्तव कोकण रेल्वेच्या दादर रत्नागिरी,दिवा सावंतवाडी,तसेच इतर गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. सद्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे.परंतु सद्यस्थितीत सुरू असलेल्या हाँलिडे स्पेशल गाड्यांना रिझर्व्हेशन असलेल्या तसेच कंरट टिकिटनसल्यानेखेड,दापोली,मंडणगड या तालुक्यातील नागरिकांना प्रवास करता येत नसल्याने नकरिकांची गैरसोय होत आहे.यास्तव आपणास कळवु ईच्छितो की कोरोनाचा काळ कमी झाला असल्याने नागरीकांच्या होत असणाऱ्या गैरसोई दुर करण्यासाठी बंद करण्यात आलेल्या दादर रत्नागिरी,दिवा सावंतवाडी तसेच इतर लोकल गाड्या तात्काळ सुरु करण्यात यावे तसेच सदरच्या गाड्या सुरु होई पर्यंत हाँलिडे स्पेशल या गाड्यासांठी करंट तिकीट तात्काळ सूरू करण्यात यावे.अशी मागणी करण्यात आली
*या प्रसंगी खेड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष श्री.राजु शेठ संसारे, खेड नगरपरिषदेचे मा.गटनेते व नगरसेवक श्री.अजय माने,नगरसेवक श्री.ईलयाज खतीब,नगरसेवक श्री.तोसीफ खोत,नगरसेविका सौ.जयमाला पाटणे,मुरडे ग्रामपंचायत माजी सरपंच श्री.मनोहर शिबे,कु. सुरज प्रसाद,कु करण प्रसाद, कु.समीर प्रसाद,कु.हर्षद कांबळे,कु.अक्षय बेलोसे,श्री,प्रणव म्हापुसकर, कु.अल्पेश पवारखेड शहर प्रसिद्धी माध्यम प्रमुख श्री.किशोर साळवी तसेच सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
www.konkantoday.com