कोकणात माझ्या उद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून उद्योजक निर्माण व्हावेत – केंद्रीय मंत्री नारायण राणे
मी दिल्लीत केंद्रिय मंत्री असलो तरीही माझे सारे लक्ष माझ्या कोकणाकडे आहे.मी जोडलेली कोकणातील माणसं ही पदाने नव्हेत तर प्रेमाने जोडली आहेत. पद मिळतील आणि जातीलही परंतु माझ माझ्या कोकणच्या जनतेशी असलेल नातं हे अतुट आहे. कोकणात माझ्या उद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून उद्योजक निर्माण होऊन त्यातून कोकणात प्रत्येकजण उद्योगी बनला पाहिजे. एकहीजण बेकार रहाता कामा नये हा माझा प्रयत्न आहे. या प्रयत्नाना आपण फक्त साथ द्या. असे आवाहन केंद्रिय सूक्ष्म, लघु, मध्यम विभागाचे मंत्री ना. नारायण राणे यांनी केले.
www.konkantoday.com