राजापूर – नाटे – महिला बचत गटांच्या वतीने भव्य दीपावली महोत्सवाचे आयोजन !
राजापूर तालुक्यातील नाटे येथे देवाचेगोठणे प्रभाग संघाच्या अंतर्गत येणाऱ्या महिला बचत गटांच्या वतीने दीपावली महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर महोत्सव ग्रामपंचायत नाटे च्या पटांगणामध्ये आयोजित करण्यात आला असून हा महोत्सव दिनांक 29 ऑक्टोबर 2021 ते 2 नोव्हेंबर 2021 या कालावधीमध्ये करण्यात येणार आहे. सदर महोत्सवांमध्ये देवाचे गोठणे प्रभाग संघातील अनेक बचत गटांनी पालेभाज्या, दिवाळी फराळ, दिवाळी फराळ बनवण्याचे साहित्य, भांडी, कपडे खाद्यपदार्थ इत्यादींची स्टॉल मोठ्या प्रमाणात लावले आहेत. या महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य दीपक नागले यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या वेळी ग्रामपंचायत नाटेच्या सरपंच सौ.योगिता बांदकर, उपसरपंच पुरुषोत्तम थळेश्री, ग्रामविकास समन्वय समिती नाटेचे अध्यक्ष श्री. रमेश लांजेकर, ग्रामपंचायत सदस्य साक्षी पवार, अवधूत ताकवडे, देवाचेगोठणे प्रभाग संघाच्या अध्यक्षा सीमा गोठणकर, प्राजक्ता कदम, संदेश पाथरे, निलिन करंजवकर, संदीप बांदकर, संतोष पांगले, नरेश साखरकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. सदर महोत्सवाच्या नियोजनासाठी शक्ती ग्रामसंघाच्या अध्यक्ष सौ. मनाली करंजवकर, सार्थक ग्रामसंघाच्या अध्यक्षा सौ. विभावरी महाकाळ, सरोज गिरकर, वैजंती लिंगायत, अनघा आडविलकर, यास्मिन बोरकर इत्यादी महिला बचत गटाच्या प्रतिनिधींनी पुढाकार घेतला. महिलांच्या कौशल्य विकासासाठी व रोजगारासाठी असे महोत्सव आयोजित करणे अत्यंत आवश्यक असल्याचे जिल्हा परिषद सदस्य दीपकची नागले यांनी म्हटले. नाटे ग्रामपंचायत सरपंच सौ. योगिता बांदकर आणि ग्रामविकास समन्वय समितीचे अध्यक्ष श्री. रमेश लांजेकर यांनी विभागातील सर्व लोकांनी आवर्जून या महोत्सवाला भेट देऊन महिलांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन केले आहे.
www.konkantoday.com