माडबनचे सुपुत्र असलेले ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांच्या पुढाकाराने माडबनमध्ये पुन्हा रापण व्यवसायाला सुरुवात

राजापूर तालुक्यातील माडबन येथे गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेल्या रापण व्यवसायाला पुन्हा नव्याने सुरुवात होत असून यासाठी माडबनचे सुपुत्र असलेले ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांनी पुढाकार घेतला असून ग्रामस्थांनी ही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.गेल्या पन्नासपेक्षा जास्त वषार्हून अधिक काळ मच्छीमारी व्यवसायातील रापण हा प्रकार माडबन येथे बंद होता. गंगाराम गवाणकर गेल्या दोन वर्षांपासून आपल्या माडबन या मूळगावी वास्तव्यास आहेत. गेल्या दोन वर्षात कोरोना संकटाच्या पार्श्वभुमीवर शहरातून गावाकडे परतलेले अनेक युवक, बंद पडलेले अनेक व्यवसाय, अनेक नैसर्गिक आपत्ती यामुळे मेटाकुटीला आलेले सर्वच ग्रामस्थ ही विदारक स्थिती पाहता संघटितपणे काही तरी केले पाहिजे असा विचार मनात आल्यानंतर सांघिकपणे रापण प्रकारची मच्छीमारी आपण करू शकतो की ज्यामुळे सर्वांनाच मोठ्या प्रमाणावर उपजीविकेचे साधन मिळू शकेल हा विचार त्यांच्या मनात आला.
त्यांनी गावातील अनेक ग्रामस्थांना हा विचार बोलून दाखविला. गावातील मच्छीमारी करणारे अनेक लोक ग्रामपंचायतीच्या सरपंच व सर्व सदस्य आणि गावातील अनेक जाणकार मंडळी यांच्याशी चर्चा करण्यात आली दसऱ्याच्या मुहूर्तावर गावातील अनेक ग्रामस्थांनी युवकांनी एकत्रित येत आपण रापण प्रकारचा मच्छिमारी व्यवसाय सुरू करण्याचा एक मुखी निर्णय घेतला.
गंगाराम गवाणकर यांचे अनेक मित्र मालवण भागात आहेत त्या ठिकाणी सुरू असलेल्या व्यावसायिकांकडून रापण मिळेल का याविषयी माहिती घेण्यात आली. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी गंगाराम गवाणकर यांच्या अध्यक्षतेखाली तर माजी पोलीस पाटील आणि मच्छीमार श्यामसुंदर गवाणकर यांना कार्याध्यक्ष करत संघटनेची ही स्थापना करण्यात आली आणि बघता बघता सुमारे दीड लाख रुपयांचा निधी संकलित झाला. देवगड तांबळडेग या परिसरातून रापण ही उपलब्ध झाली. गावातील अनेक कुटुंबे या संघटनेत म्हणजेच या व्यवसायात सहभागी झाले आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button