
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची एनसीसीएस संस्थेवर सदस्यपदी नियुक्ती
———————————————– — राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांची केंद्र सरकारच्या वतीने केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री यांनी ‘राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंद्र’ ( National Centre For Cell Science ) या संस्थेवर सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे.
मंत्री. श्री.सामंत यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून आपल्या निवडीची माहिती दिली आहे. या नियुक्तीमुळे सामंत यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंद्र या संस्थेवरील सामंत यांची सदस्य म्हणून ३ वर्षासाठी नियुक्ती असणार आहे. या संस्थेवर सदस्य म्हणून आपली निवड केल्याबद्दल विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री व संस्थेचे श्री. सामंत यांनी आभार मानले आहेत.
www.konkantoday.com