‘रेस्टॉरंट ऑन व्हील’ला पर्यटक आणि मुंबईकरांकडून तुफान प्रतिसाद

मध्य रेल्वेने सुरू केलेल्या ‘रेस्टॉरंट ऑन व्हील’ला पर्यटक आणि मुंबईकरांकडून तुफान प्रतिसाद मिळत आहे. आठवड्याभरात ‘रेस्टॉरंट ऑन व्हील’ला अडीच हजारपेक्षा जास्त नागरिकांनी भेट देत रेल्वेच्या डब्यात बसूनच खाद्यपदार्थांची चव चाखली.नागरिकांचा प्रतिसाद पाहता लवकरच अन्य रेल्वे स्थानकातही ही संकल्पना लवकरच राबविण्यात येणार आहे.
मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या १८ क्रमांकाच्या फलाटाबाहेर ‘रेस्टॉरंट ऑन व्हील’ सुरु झाले आहे. या संकल्पनेसाठी रेल्वेच्या जुन्या कोचचे रुपांतर रेस्टॉरंटमध्ये करण्यात आले आहे. ४० जणांच्या बसण्याची सोय असलेल्या या रेस्टॉरंटमध्ये नागरिकांना शाकाहारी आणि मांसाहारी असा दोन्ही जेवणांचा आस्वाद घेता येणार आहे. मध्य प्रदेशमध्ये रेल्वे टूरिझम कॉर्पोरेशनने राबवलेल्या या संकल्पनेला चांगला प्रतिसाद मिळाल्याने मुंबईमध्ये ही संकल्पना राबवण्यात आली. त्याला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत २५०० नागरिकांनी या रेस्टॉरंटला भेट दिल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. ए. के सिंह यांनी दिली.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button