रत्नागिरी जिल्ह्यात विविध ग्रामीण रुग्णालयात उभारण्यात आलेल्या ऑक्सिजनचे प्लॅन्टचा उद्या लोकार्पण -मंत्री उदय सामंत
रत्नागिरी जिल्ह्यात विविध ग्रामीण रूग्णालयात उभारण्यात येणार्या ऑक्सिजन प्लान्टचा लोकार्पण सोहळा उद्या होत असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली या कार्यक्रमाला पालकमंत्री अनिल परब यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले ग्रामीण भागातील रूग्णालयात ऑक्सिजन सुविधा उपलब्ध व्हावा यासाठी हे प्लॅन्ट उभे करण्यात आले असून कोरोना रूग्णा प्रमाणेच अन्य गंभीर रुग्णांना देखील ऑक्सिजनची आवश्यकता भासत असते जिल्ह्यातील पाली संगमेश्वर राजापूर तसेच जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयात हे ऑक्सिजन प्लान्ट उभारण्यात आले आहेत त्यामुळे ग्रामीण भागात ही सेवा उपलब्ध झाल्याने त्याचा फायदा ग्रामीण जनतेला होणार आहे याशिवाय जिल्ह्यात चार डायलिसिस उपलब्ध होत आहेत शहरांप्रमाणेच ग्रामीण भागातही आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व आम्ही सर्व सांघिक प्रयत्न करीत आहोत याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील ग्रामीण रूग्णालयात देखील मोठ्या प्रमाणावर रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत
त्यामुळे आता या भागातील जनतेला उपचारासाठी कोल्हापूर मुंबईकडे धाव घ्यावी लागणार नाही आरोग्य यंत्रणा चांगली सक्षम करण्याच्या दृष्टीने दोन्ही जिल्हे वाटचाल करीत असल्याचेही सामंत यांनी सांगितले
www.konkantoday.com