
जिवावर उदार होऊन कोरोना काळात काम करणार्या कंत्राटी कामगारांपैकी काही जण तुटपुंज्या पगारावर तर काही जणाना मानधनही नाही,आरोग्य भरतीत प्राधान्य देण्यासाठी हायकोर्टात धाव
रत्नागिरीजिल्ह्यात शासनाकडून आरोग्य यंत्रणेसाठी मोठमोठय़ा सुविधा उपलब्ध केल्या जात असल्याचे जाहीर करण्यात येत असले तरी करोना काळात जिवावर उदार होऊन महिला रुग्णालयाच्या ठिकाणी काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांपैकी काहीजणांना अपुरे मानधन देण्यात येत आहे तर काहीजणांना तीन महिन्यांचे मानधन मिळालेले नाही व नियुक्तीही मिळालेली नाही त्यामुळे या कामगारांची अवस्था गरज सरो वैद्य मरो अशी झाली आहे काेराना काम केलेल्या कर्मचाऱ्यांना आरोग्य भरतीत प्राधान्य द्यावे तसे आदेश असतानादेखील शासनाकडून ते डावलण्यात आले आहेत त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी आता हायकोर्टात धाव घेऊन भरतीत प्राधान्य मिळावे अशी मागणी केली आहे
रत्नागिरी महिला रूग्णालयात कोरोना रुग्णालय सुरू करण्यात आल्यानंतर तेथे अॅम्ब्युलन्स चालकभरती करण्यात आली रत्नागिरी येथील महिला रुग्णालयात अॅम्ब्युलन्सवर वाहनचालक म्हणून डी एम एंटरप्रायझेस कडून नियुक्तीचे आदेश देण्यात आले होते सदर आदेशाप्रमाणे या वाहनचालकांनी कोराेनाच्या पहिल्या व दुस याला लाटेत जीवाची पर्वा न करता काम केले आहे यामध्ये त्याने कोरोना रुग्णांची नेआण करण्यापासून मृतदेहांचे ने आण करण्याबाबत कामे केली आहेत त्यापोटी त्यांना सप्टेंबरपर्यंत ७३००ते ८००० असा तुटपुंजा पगार देण्यात येत आहे
हा एवढा तुटपुंजा पगार आहे की त्यामध्ये घर कुटुंब सांभाळणे अशक्य असल्याचे त्यांचे म्हणणे आहे तर याच रुग्णालयात कंत्राटी पध्दतीने भरण्यात आलेल्या वॉर्डबॉय व इतरांना गेल्या तीन महिन्यांपासून पगारही झालेला नाही काहीजण टेक्निशियन असूनही ते सध्या वॉर्डबॉयची कामे करीत आहेत एवढे करूनही त्यांना गेले काही महिने पगारच होत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली असून कर्जाचे हप्ते व घरभाडे भरणे देखील त्यांना शक्य होत नाही तसंच त्यानं सप्टेंबरपासून नियुक्तीचे आदेशही देण्यात आलेले नाहीत याबाबत लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकार्यांना वारंवार निवेदने देण्यात येऊनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे आता कराेनाची लाट ओसरल्यामुळे कंत्राटी कामगारांकडे दुर्लक्ष केले जात असल्याने त्यांचे हाल होत आहेत याबाबत त्यांनी अतिशय तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत
आरोग्य यंत्रणेत महत्त्वाचा घटक असलेल्या कर्मचार् यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याने जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सक्षम कशी होणार असा सवाल उपस्थित होत आहे त्यामुळे कराेना काम केलेल्या कर्मचाऱ्यांना आरोग्य भरतीत प्राधान्य मिळावे यासाठी हे कर्मचारी आता हायकोर्टात गेले आहेत
www.konkantoday.com