जिल्हा प्रशासनाने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ११ पैकी ८ ऑक्सिजननिर्मिती केंद्र सुरू केली
रत्नागिरीत जिल्हा प्रशासनाने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ११ पैकी ८ ऑक्सिजननिर्मिती केंद्र सुरू केली आहेत. त्यातून दिवसाला सुमारे ८. ८५ मेट्रिक टन ऑक्सिजन तयार होणार आहे.उर्वरित तीन ऑक्सिजन केंद्र लवकरच सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी सुमारे ३ कोटी ७७ लाख रुपये खर्च आला आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आहे. रुग्ण कमी असल्याने महत्त्वाच्या ठिकाणची कोविड सेंटर सोडली, तर बहुतेक कोविड सेंटर प्रशासनाने बंद केली आहेत. तरी तिसऱ्या लाटेची तयारी प्रशासन आणि आरोग्य विभागाने करीत आहेत.
www.konkantoday.com