पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेला ऐतिहासिक वासोटा किल्ल्याचा ट्रेकआज पासून सुरू
ट्रेकर्सना भुरळ घालणाऱ्या वासोटा या किल्ल्याची सफर अविस्मरणीय असते.पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेला ऐतिहासिक वासोटा किल्ल्याचा ट्रेकआज शनिवार (दि २३) ऑक्टोबरपासून सुरू होत आहे.करोनाच्या पार्श्वभूमीवर बंद झालेला हा ट्रेक सुरू होत असल्याने पर्यटक व ट्रेकर्स यांच्यात आनंदाचे वातावरण आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या राखीव क्षेत्रात वासोटा किल्ला वसलेला आहे. दुर्गम असलेला हा किल्ला व्याघ्रगड म्हणून ओळखला जातो.
कोयनेच्या शिवसागर जलाशयातील दीड तासांचा बोटीचा प्रवास, सभोवताली सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे राखीव जंगल, पशुपक्ष्यांचा मुक्त संचार अशा रम्य वातावरणात वासोट्याच्या पायथ्याला पोहोचता येते
www.konkantoday.com