पत्नीशी पटत नसल्याने पतीने केला खून; खेडमधील घटनेचा पोलिसांनी केला उलगडा

खेड : पत्नीशी पटत नसल्याने पतीने पत्नीचा काटा काढल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी पती कादरबादशा नदाफ यास अटक केली आहे. त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता २ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या महिलेचा मृतदेह दि.३ रोजी संशयास्पद परिस्थितीत आढळल्यानंतर घातपाताचीच शक्यता वर्तविण्यात येत होती. त्यादृष्टीने पोलीस साऱ्या शक्यतांचा पडताळा करत होते. या प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या कादरबादशा नदाफ याची प्रकृती बिघडल्याने त्याला उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पोलिसांनी केलेल्या तपासाअंती घरगुती कारणावरून त्यानेच पत्नीचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button