तक्रारी झालेल्या ग्रामीण नळपाणी पुरवठा योजना आता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांच्या रडारवर
चिपळूण तालुक्यात तक्रारी झालेल्या ग्रामीण नळपाणी पुरवठा योजना आता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांच्या रडारवर आल्या आहेत. ग्रामस्थांच्या तक्रारी, प्रशासकीय व तांत्रिक चौकशा पूर्ण होवून एवढेच नव्हे तर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देवूनही अद्याप या योजनांबाबत कायदेशीर कारवाई झाली नसल्याने पाणी योजनांचे पाणी कुठे मुरतयं, असा प्रश्न तक्रारदारांना पडला आहे. मात्र असे असतानाच सीईओंनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत लक्ष घातल्याने या योजनांमध्ये गैरव्यवहार करणार्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.
www.konkantoday.com