कर्जाचा डोंगर, थकीत कर आणि चित्रपटगृहांच्या दुरवस्थेमुळे राज्यातील सुमारे ६०ते ७० टक्के एकपडदा चित्रपटगृहे (सिंगल स्क्रीन) बंदच
गेली १८ महिने बंद असलेली एकपडदा आणि बहुपडदा चित्रपटगृहे खुली करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत.परंतु, कर्जाचा डोंगर, थकीत कर आणि चित्रपटगृहांच्या दुरवस्थेमुळे राज्यातील सुमारे ६० ते ७० टक्के एकपडदा चित्रपटगृहे (सिंगल स्क्रीन) बंदच ठेवणे चालक-मालकांनी पसंत केले. शुक्रवारी सुरू झालेल्या एकपडदा चित्रपटगृहांत केवळ ५ ते १० टक्के आणि बहुपडदा (मल्टीप्लेक्स) चित्रपटगृहातही १० ते १५ टक्के प्रेक्षक उपस्थित होते.
www.konkantoday.com