आता पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा दिवाळीनंतर सुरू केल्या जाणार
राज्यात पाचवी ते बारावीपर्यंतच्या शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालये सुरू झाल्यानंतर आता पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा दिवाळीनंतर सुरू केल्या जाणार आहेत.त्यासाठी आज सर्व जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत (CEO) आढावा घेण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ऑनलाईन बैठक घेतली. त्यात शाळा सुरू करण्यासाठी राज्यात सकारात्मक वातावरण असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आपले मत नोंदवल्याने राज्यात लवकरच पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.याबाबत टास्क फोर्स व मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे
www.konkantoday.com