थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांना संबोधित करणार
थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांना संबोधित करणार आहेत. सकाळी १० वाजता नरेंद्र मोदी देशवासियांशी संवाद साधणार असून नेमकी कोणती घोषणा करणार?कुठल्या विषयावर भाष्य करणार याकडे आता सर्व देशाचे लक्ष लागलेलं आहे. पंतप्रधान मोदी देशवासियांना संबोधित करणार असल्याची माहिती PMO कार्यालयाने ट्विट करुन दिली आहे.
नुकताच भारताने 100 कोटींच्या लसीकरणाचा टप्पा ओलांडला आहे आणि ही मोहिम अद्यापही सुरू आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाष्य करुन वैद्यकीय यंत्रणांची पाठ थोपवण्याची शक्यता असून जनतेचेही कौतुक करणार असल्याचं बोललं जात आहे.
www.konkantoday.com