
दापोली तालुक्यातील बांधतिवरे येथे रानगव्याचे दर्शन
दापोली तालुक्यातील बांधतिवरे येथे रानगव्याचे दर्शन झाले असून या मार्गावर रात्रीचा प्रवास करणार्या वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बांधतिवरे नदीलगत रानगवा गेले काही महिने येथील ग्रामस्थांच्या निदर्शनास येत आहे. मात्र अद्याप कोणत्याही प्रकारचे नुकसान या रानगव्याने केलेले नसल्याचे चौकशी दरम्यान ग्रामस्थांनी सांगितले. www.konkantoday.com