ओणी-पाचल-अणुस्कुरा रस्त्याच्या दुर्दशेविरोधात मनसेचा महामोचा
राजापूर तालुक्यातील ओणी-पाचल-अणुस्कुरा रस्त्याच्या दुर्दशेबाबत वारंवार आवाज उठवूनही शासन आणि प्रशासन दखलच घेत नसल्याने सोमवारी दि. १८ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने जवळेथर फाटा ते पाचल बसस्थानक दरम्याने मोर्चा काढण्यात आला. यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. येत्या आठ दिवसांमध्ये रस्त्याच्या दुरूस्तीचे काम सुरू न झाल्यास संबंधित अधिकार्यांना डांबून ठेवू, असा इशारा मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश सौंदळकर यांनी यावेळी दिला. मग होणार्या परिणामाला सामोरे जाण्याची आमची तयारी आहे, अशी गर्जनाही त्यांनी केली. www.konkantoday.com