
केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे यंदाची दिवाळी गोड होणार
गेल्या अनेक दिवसांपासून केंद्र सरकार हे खाद्यतेलाचे दर कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे. आता या निर्णायाचा फायदा सर्वसामान्य जनतेला सणासुदीत होणार आहे.ऐन सणासुदीच्या काळातच हा निर्णय होत असल्याने सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळणार आहे. महागाई आणि दिवसेंदिवस वाढत असलेले दर यामुळे मुलभूत गरजांचा पुरवठा करताना तारेवरची कसरत करावी लागत होती. पण केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे यंदाची दिवाळी गोड होणार आहे. खाद्यतेलावरील आयातशुल्क हे कमी करण्यात आले असून त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश केंद्र सरकारने राज्य सरकारला दिलेले आहेत.
केंद्र सरकारकडून खाद्यतेल आणि तेलबियांवरील आयातशुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला होता. यातच आता कच्च्या तेलावरील सीमाशुल्कही रद्द करण्यात आला आहे. याचाच अर्थ असा की, सरकारने पामतेल आणि सनफ्लावॅर तेल यावरील कृषी उपकर आणि कस्टम ड्युटी कमी केली आहे. त्यामुळे दरात घसरण होणार आहे
www.konkantoday.com