दिवाळीनंतर करोनाच्या लसीचा एक डोस घेतलेल्या व्यक्तींना मॉलमध्ये प्रवेश व लोकलने प्रवाश करण्याचीही मुभा मिळणार
राज्यात करोनाचा प्रादुर्भाव कमी होत चालला असल्याने अनेक नियमांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. आता महाराष्ट्र हळूहळू संपूर्ण अनलॉक होण्याच्या दिशेने प्रवास करत आहे.
शाळा, मंदिरं सुरु झाल्यानंतर आता दिवाळीनंतर करोनाच्या लसीचा एक डोस घेतलेल्या व्यक्तींना मॉलमध्ये प्रवेश मिळणार असून लोकलने प्रवाश करण्याचीही मुभा मिळणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. याबाबत दिवाळीनंतर मुख्यमंत्री निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
www.konkantoday.com