अरे कोण नरेंद्र मोदी? बाळासाहेब ठाकरे नसते तर त्यांचं अस्तित्व केव्हाच संपलं असतं-शिवसेना आमदार भास्कर जाधव
अरे कोण नरेंद्र मोदी? बाळासाहेब ठाकरे नसते तर त्यांचं अस्तित्व केव्हाच संपलं असतं. अशी टीका कोकणातील शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी सावर्डे येथील एका मेळाव्यात बोलताना केली आहे.
अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी नरेंद्र मोदी यांना पक्षातून काढण्याबाबत गंभीर होते. त्यावेळी केवळ बाळासाहेब नरेंद्र मोदींच्या पाठिशी उभे राहिले. म्हणून नरेंद्र मोदी आज पंतप्रधान झाले. अन्यथा त्याच दिवशी मोदी घरी गेले असते. गुजरात दंगलीवेळी बाळासाहेब मोदींच्या मागे उभे राहिले नसते तर मोदींचं अस्तित्व केव्हाच संपलं असतं. शिवाय तुम्ही बाळासाहेबांच्या फोटोमुळे मोठे झालात. नरेंद्र मोदींच्या नाही अशा शब्दात यावेळी भास्कर जाधव यांनी थेट भाजपवर देखील निशाणा साधला. आपल्या भाषणादरम्यान जाधव यांनी देवेंद्र फडणवीसांसह चंद्रकांत पाटील, किरिट सोमय्या यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. सावर्डे येथील मेळाव्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केलं आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा जाधव यांच्या या विधानामुळे दोन्ही पक्षांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप रंगण्याची शक्यता आहे.
www.konkantoday.com