
सिंधुदुर्गात मेडिकल कॉलेजच्या केवळ वल्गना
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय सेवेतील डॉक्टर प्रामाणिकपणे सेवा बजावत आहेत; पण सरकारने त्यांना वाऱ्यावर सोडले आहे. शासकीय सेवेतील ४६ पैकी ४३ डॉक्टर हे बीएएमएस आणि एबीबीएस आहेत; पण त्यांना पगार मिळालेला नाही. मेडिकल कॉलेजच्या वल्गना करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी याबाबत आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे असे तेली म्हणाले. पगार होत नसल्याने २७ पैकी १६ डॉक्टरांनी परतीचा मार्ग पत्करला आहे. इतरही काही डॉक्टर सेवा सोडण्याच्या विचारात आहेत. अशा स्थितीत जिल्ह्यात मेडिकल कॉलेज आणण्याच्या घोषणा करणारे सत्ताधारी नेते याप्रश्नी सामाजिक बांधिलकी ठेऊन लक्ष देणार का? असा सवाल तेली यांनी केला.
www.konkantoday.com