
देवाचे गोठणे ठरणार रोल मॉडेल
गावाची केंद्र शासनाची महत्वाकांक्षा योजना असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे तालुक्याचे मॉडेल गाव म्हणून देवाचे गोठणे गावाची निवड झाली आहे. या योजनेच्या माध्यमातून गावामध्ये विविध विकासकामे करताना त्याद्वारे गावच्या विकासाला चालना देत लोकांच्या हाताला काम अन रोजगारही मिळवून देण्यात येणार आहे. मनरेगातून विविध विकासकामे करून गावाला रोल मॉडेल बनविण्याचा निर्धार ग्रामस्थ आणि प्रशासनाच्या उपस्थितीत झालेल्या कार्यशाळेत करण्यात आला.
www.konkantoday.com