रत्नागिरी जिल्ह्यातील लांब पल्ल्याच्या मार्गावर मर्यादित थांबे, एस.टी. सेवा सुरू करण्याची मागणी
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हांतर्गत एस.टी. बस सेवा पूर्ववत करण्यात आली आहे. मात्र या बसेस सर्व प्रवासी थांब्यांवर थांबे घेत असल्याने वाहतुकीच्या वेळापत्रकावर त्याचा परिणाम होऊन प्रवाशांचे हाल होत आहेत. तरी जिल्ह्यातील लांब पल्ल्याच्या मार्गावर मर्यादित थांबे एस.टी. सेवा सुरू करावी, अशी मागणी प्रवाशांमधून केली जात आहे. www.konkantoday.com