चिपळूण तालुक्यातील गाणे गावची सुकन्या आणि नुकताच सिक्रेट इन्फॉर्मेशन ऑफिसर (एस.आय.ओ.) पदभार स्वीकारणारी प्राजक्ता गणेश कदम हिचे ग्रामस्थां कडून जंगी स्वागत
चिपळूण तालुक्यातील गाणे गावची सुकन्या आणि नुकताच सिक्रेट इन्फॉर्मेशन ऑफिसर (एस.आय.ओ.) पदभार स्वीकारणारी प्राजक्ता गणेश कदम ही बुधवारी गावी आली. स्वतंत्र गाडी आणि दोन सुरक्षा रक्षकांसह तिचे गावात आगमन झाले आणि तिची आई व ग्रामस्थ भारावून गेले. प्राजक्ताच्या स्वागतासाठी अगदी कान्हे-पिंपळीपासून परिसर गजबजून गेला होता. ग्रामस्थांनी तिचे जंगी स्वागत करीत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कर्तृत्व गाजविणार्यांसमोर परिस्थिती केव्हाच आडवी येत नाही, हेच प्राजक्ताने दाखवून दिलं आहे. गरिबीचे चटके सहनक करत, खडतर प्रवासातही आपले ध्येय गाठणारर्या या सुकन्येचे स्वागत करण्यासाठी कान्हे-पिंपळीपासून दोनशेहून अधिक ग्रामस्थ जमले होते. ठिकठिकाणी तिच्या स्वागताचे फलकही लावण्यात आले होते. विशेष म्हणजे ज्या मातृत्वाने अपार कष्ट करुन, गवंडी कामातून जमविलेल्या पैशातून प्राजक्ताला शिकविण्याची उमेद दिली तिचेही नाव प्राजक्ताच्या नावापुढे जोडून या मातेचा ग्रामस्थांनी सन्मान केला. www.konkantoday.com