सोलापूरमधील बार्शी शहरात पैशाच्या वादातून रागाच्या भरात आईच्या डोक्यात दगड घालून तिची निघृण हत्या करणार्या मुलाला रत्नागिरीत अटक
रत्नागिरीः- सोलापूरमधील बार्शी शहरात पैशाच्या वादातूनरागाच्या भरात आईच्या डोक्यात दगड घालून तिची निघृण हत्याकरणाऱ्या मुलाला रत्नागिरी शहर पोलिसांनी भाट्ये येथे
गुरुवारी अटककरून सोलापूर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.गुन्हे प्रगटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजभोसले यांच्या पथकाने हि कारवाई केली.बार्शी शहरातील सुभाषनगर भागातील वाणी प्लॉट येथे राहत्याघरामध्ये मुलानेच आईच्या डोक्यामध्ये दगड घालून खून करून
पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह घराबाहेर फरफटत आणूनप्लास्टिक मध्ये गुंडाळून झुडपामध्ये टाकून दिल्याची घटनातब्बल तीन दिवसांनी उघडकीस आली होती. बार्शी शहर
पोलिस ठाण्यात मुलाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.श्रीराम नागनाथ फावडे (वय २१) असे गुन्हा दाखल झालेल्यासंशयित तरुणाचे नाव आहे. पोलिस हवालदार अरुण माळी
यांनी फिर्याद दाखल केली. रुक्मिणी नागनाथ फावडे (वय ४५)असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. ही घटना मंगळवारीसकाळी साडेआठच्या दरम्यान उघडकीस आली होती.
www.konkantoday.com