
अठरा वर्षांखालील मुलांना शुक्रवारपासून रेल्वेप्रवास करता येणार
अठरा वर्षांखालील मुलांना शुक्रवारपासून रेल्वेप्रवास करता येणार आहे. यासंदर्भात राज्य सरकारच्या सूचनेनंतर मध्य आणि पश्चिम रेल्वेने या मुलांना लोकल प्रवासाची परवानगी देण्याचा निर्णय घेतला.लोकल प्रवासासाठी १८ वर्षांखालील मुला-मुलींना मासिक पासच घ्यावा लागणार आहे. त्यांना तिकीट सुविधा नसेल, असेही स्पष्ट करण्यात आले. मासिक पास घेण्यासाठी तिकीट खिडक्यांवर त्यांना पुरावा म्हणून ओळखपत्र दाखवावे लागेल. प्रवासावेळी पास आणि ओळखपत्रही सोबत बाळगावे लागेल, असे मध्य व पश्चिम रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.
www.konkantoday.com