
*शिवसेनेचे महाअधिवेशन आजपासून; मुख्यमंत्र्यांसह नऊ मंत्री उपस्थित राहणार*
_____शिवसेनेचे राज्यस्तरीय महाअधिवेशन कोल्हापुरमध्ये शुक्रवारपासून (ता. 16) होणार आहे. खु्द्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या अधिवेशनात मार्गदर्शन करणार आहे. मुख्यमंत्र्यांसह या अधिवेशासाठी नऊ मंत्री, 43 आमदार, 13 खासदार कोल्हापुरामध्ये येणार आहेत .शुक्रवार (ता.16), शनिवार (ता.17) असे दोन दिवस महासैनिक दरबार येथे हे अधिवेशन होत आहे. अधिवेशनासाठी जिल्ह्यातील सुमारे 100 हून अधिक हॉटेलमधील दोन हजार खोल्यांचे बुकिंग शिवसेनेकडून करण्यात आले आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः दोन दिवस कोल्हापुरात असणार आहेत. शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महाअधिवेशनाचे उद्घाटन होणार आहे, अधिवेशनात तीन सत्र असतील. शनिवारी सायंकाळी गांधी मैदान येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे. अधिवेशासाठी साधारण दोन हजारांहून पदाधिकारी सलग तीन दिवस कोल्हापुरात असतील.www.konkantoday.com