चाचण्या करून घेण्याची टाळाटाळ करू नये आरोग्य मंत्रालयाच्या इशारा

मास्क न वापरणे, रस्त्यावर थुंकणे यांसारख्या सवयींचा लोकांनी त्वरित त्याग करावा व विशेषतः चाचण्या करून घेण्याची टाळाटाळ करू नये, अन्यथा फार उशीर होईल, असा इशारा आरोग्य मंत्रालयाने दिला. महाराष्ट्रासह देशातील पाच राज्यांतच देशातील एकूण रुग्णसंख्येच्या ६२ टक्के रुग्ण व ७० टक्के मृत्यू झाल्याचेही सांगण्यात आले. त्यातही महाराष्ट्रात देशाच्या तुलनेत तब्बल २६.८५ टक्के व आंध्र प्रदेशात ११.०८ टक्के रुग्ण आढळत आहेत.सामाजिक अंतरभान न पाळता गर्दी करणे यासारखे विषय यंत्रणेसाठी चिंताजनक ठरत असल्याचेही सरकारने मतप्रदर्शन केले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button