
रत्नागिरीमध्ये सागरी साहसी खेळ कॅम्पचे आयोजन, रत्नागिरीच्या समुद्रात मुलं अनुभवणार खेळांचा थरार
रत्नागिरीमध्ये सागरी साहसी खेळ कॅम्पचे आयोजन करण्यात येत आहे
रत्नागिरीला अथांग सागराची देणगी आणि उपजत कलागुण असतानाही बोट पुलिंग, सेलिंग अशा साहसी खेळामध्ये येथील मुलांना सहभागी होता येत नाही. समुद्रातील मुलांनाही साहसी खेळामध्ये सहभागी होता यावे, यासाठी नॅशनल लेव्हल बोट सेलिंग स्पर्धेतील गोल्ड मेडलिस्ट सुशांत शिवलकर यांनी येथील जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित यांच्या सहकार्याने रत्नागिरीमध्ये सागरी साहसी खेळ कॅम्पचे आयोजन केले असून यामध्ये बोट पुलिंग, सेलिंग यासारखे साहसी खेळांचा समावेश केला आहे.
मुलांना सागरी खेळांचे शिक्षण व यासाठी आवश्यक असणारी साधने रत्नागिरीमध्ये उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा यॉटिंग ऍण्ड वॉटर स्पोर्ट असोसिएशन ही संस्था स्थापन करण्याचे ठरवले असून या संस्थेच्या नोंदणीनंतर लवकरच ही संस्था रत्नागिरीमध्ये स्थापन केली जाणार असल्याची माहिती सुशांत शिवलकर यांनी दिली आहे. येथील मुलांना महाविद्यालयामध्ये नेव्हल एनसीसीमध्ये तीन वर्षाचे शिक्षण घेतल्यानंतर याविषयीचे अधिक शिक्षण बाहेरगावी जावून घेणे शक्य नसते. मात्र अशा मुलांना या संस्थेमुळे आपले शिक्षण आणि आपला छंद जोपासणे शक्य होणार आहे. सुशांत शिवलकर हे जहाजांच्या उत्कृष्ट प्रतिकृती साकारतात. सुरूवातीला थर्माकोलच्या नौका व घरांचे मॉडेल छंद म्हणून करत असत. www.konkantoday.com