
मालगुंड येथिल पडवणेवाडीवर समुद्राच्या अतिक्रमणाचे मोठे संकट घरांना धोका
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील कवी केशवसूत स्मारकाजवळ असलेल्या पडवणेवाडीवर समुद्राच्या अतिक्रमणाचे मोठे संकट उभे राहिले आहे. गेल्या काही वर्षापासून समुद्राने थोडाथोडा या गावाचा किनारा गिळंकृत केला आहे. त्यामुळे किनारी भागातील वाडीतील ग्रामस्थांचे जीवनमान धोक्यात आले आहे.
यावर्षी तर ५ ते २० फूट जमिनीचा भाग कोसळून तो समुद्रात वाहून गेला आहे. त्यामुळे येथील २५ घरांना धोका निर्माण झाला असून उधाणाच्या भरतीच्यावेळी ग्रामस्थ भितीच्या सावटाखाली वावरत आहेत. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देवून या भागात धूपप्रतिबंधक बंधारा घालून संरक्षण करावे, अशी मागणी पडवणेवाडीतील ग्रामस्थांनी केली आहे. www.konkantoday.com