पूररेषेला नगरपरिषदेचा विरोध कायम,निळ्या व लाल पुररेषेविरोधात नागरिकांच्या १२ हजार २६४ हरकती आतापर्यंत प्राप्त
चिपळूण शहर उध्वस्त करणार्या निळ्या व लाल पुररेषेविरोधात नागरिकांच्या १२ हजार २६४ हरकती आतापर्यंत प्राप्त झाल्या असून या पूररेषेला नगरपरिषदेचाही विरोध आहे, अशा आशयाचा ठराव यापूर्वीच दि. ३० सप्टेंबरच्या कौन्सिलमध्ये सर्वानुमते झाला आहे. आता पाटबंधारे खात्याचे पत्र आले असून त्यांना पालिका व नागरिकांचा विरोध कळविण्यात यावा, तसेच नागरिकांच्या हरकती व सूचना याबाबतही कळवावे, म्हणजे कोणती उपाययोजना करावी, तेही ठरविण्यात मदत होईल. नदीसंवर्धन योजनेतून वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्याबरोबरच बंधारे बांधता येतील, असे पालिकेच्या सभेत ठरले. शहरातील शिवनदीचा गाळ काढण्याचे काम आज गुरूवारपासून सुरू होणार आहे. यासाठी सध्या ९ लाखांचा निधी मंजूर असून संपूर्ण नदीतील गाळ काढण्यासाठी एक कोटींची तरतूद करण्याचा निर्णय पालिकेच्या बुधवारच्या सभेत घेण्यात आला. www.konkantoday.com