कलाकारांनी आर्थिक उत्पन्न अधिक मिळावे यासाठी सजग होवून काम करणे गरजेचे आहे. -उद्योजक अजय पित्रे
संगमेश्वर तालुक्यात मातीकाम करणारे अनेक कलाकार आहेत. या कलाकारांनी आर्थिक उत्पन्न अधिक मिळावे यासाठी सजग होवून काम करणे गरजेचे आहे. या कलाकारांनी बाजारपेठेला आवश्यक असलेल्या वस्तू तयार केल्यास आपण त्याला बाजारपेठ मिळवून देऊ. येथील कलाकारांना न्याय मिळवून देण्यासाठी नेहमीच प्रयत्न करेन, असे आश्वासन उद्योजक अजय पित्रे यांनी दिले.
देवरूख डी कॅड कलामहाविद्यालय व संगमेश्वर तालुका गणेशमूर्तीकार संघटना यांच्यावतीने लहान गट व खुला गट यांच्यासाठी शारदोत्सवानिमित्त मातीची गणेशमूर्ती तयार करणे अशी स्पधां आयोजित केली होती. यावेळी अजय पित्रे बोलत होते. यावेळी कार्यवाह विजय विरकर, प्राचार्य रणजीत मराठे, संदेश झेपले, मूर्तीकार आत्माराम हुमणे, राजेंद्र जाधव, संतोष जामसंडेकर आदींसह प्राध्यापक, मूर्तीकार उपस्थित होते. www.konkantoday.com